चायनीज म्हटलं की कोणाच्याही जिभेवर पाणी येतं.
आणि त्यात पनीर चिली म्हटलं, की ती चव विसरणं अशक्यच!
चला तर मग, आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चवदार आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली – तेही S.R. Thorat Dairy च्या सुपर सॉफ्ट गगनगिरी मलाई पनीर वापरून!
लागणारे साहित्य:
पनीरसाठी:
200 ग्रॅम S.R. Thorat गगनगिरी मलाई पनीर (क्यूब्स मध्ये कापलेलं)
½ टीस्पून रेड चिली पावडर
½ टीस्पून चिल्ली फ्लेक्स
१ टेबलस्पून शेजवान चटणी
१ टेबलस्पून कॉर्न फ्लोर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
सॉस बेससाठी:
१ टीस्पून किसलेलं लसूण
२ ड्राय रेड चिली
½ कप कापलेलं कॅप्सिकम
½ कप पातळ चिरलेला कांदा
१ टेबलस्पून शेजवान चटणी
१ टेबलस्पून रेड चिली सॉस
१ टीस्पून ग्रीन चिली सॉस
१ टीस्पून सोया सॉस
¼ टीस्पून ब्लॅक पेपर
२ टीस्पून मैद्याची स्लरी (मैदा + पाणी मिक्स)
गार्निशसाठी चिरलेला कोबी (Cabbage)
कृती:
पनीर मॅरिनेशन:
एका बाउलमध्ये गगनगिरी मलाई पनीर क्यूब्स, रेड चिली पावडर, चिल्ली फ्लेक्स, शेजवान चटणी, कॉर्न फ्लोर आणि मीठ घालून मिक्स करा.
फ्राय करणे:
गरम तेलात मॅरिनेट केलेले पनीर क्यूब्स गोल्डन होईपर्यंत फ्राय करा आणि एका बाजूला ठेवा.
सॉस बेस तयार करा:
त्याच पॅनमध्ये लसूण, ड्राय रेड चिली, कांदा आणि कॅप्सिकम घालून थोडंसं शॅलो फ्राय करा.
सॉस मिक्स करा:
आता त्यात शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, ब्लॅक पेपर आणि थोडीशी मैद्याची स्लरी घालून सॉस गडद होईपर्यंत शिजवा.
पनीर टॉस करा:
शिजलेल्या सॉसमध्ये फ्राय केलेले पनीर घालून नीट मिक्स करा. प्रत्येक पनीर क्यूबवर सॉस चांगला लागायला हवा.
गार्निश आणि सर्व्हिंग:
शेवटी पातळ चिरलेली कोबी घालून गार्निश करा आणि गरमागरम पनीर चिली सर्व्ह करा.
S.R. Thorat Dairy – शुद्धतेचा विश्वास, चविष्ट अनुभव!
गगनगिरी मलाई पनीरसोबत प्रत्येक पाककृती होईल खास.
Youtube Link:
Instagram:https://www.instagram.com/reel/DJ9Ldj-PKOZ/?utm_source=ig_web_copy_link